top of page

Vijay Sir MMC
(Maharashtrache Maha Coaching)

About Us

Vijay Sir MMC – Maharashtrache Maha Coaching ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समर्पित शैक्षणिक चळवळ आहे.
आमचे उद्दिष्ट 8 वी | 9 वी  | 10वी | 11वी  & 12वी ( CBSE | SSC | SCIENCE ) पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अत्यंत कमी शुल्कात दर्जेदार आणि परिणामकारक शिक्षण उपलब्ध करून देणे आहे.

गावातील, शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी हुशार असतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक आणि Quality Education मिळत नाही. MMC हेच अंतर भरून काढण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

आम्ही Science, Commerce आणि Arts या तिन्ही शाखांबाबत मजबूत पाया, करिअर मार्गदर्शन आणि भविष्याची स्पष्ट दिशा देतो.

आमचा निर्धार एकच
गावातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याला भारताचे भविष्य बनवणे.

Mission & Vision

Vijay Sir MMC – Maharashtrache Maha Coaching

 Our Mission (ध्येय)

  • 8वी ते 12वी विद्यार्थ्यांना कमी शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे.

  • ग्रामीण, शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.

  • Science, Commerce आणि Arts या तिन्ही शाखांमध्ये मजबूत पाया तयार करणे.

  • विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन देऊन त्यांना अधिकारी, व्यावसायिक आणि जबाबदार नागरिक बनवणे.

  • गुणवत्ता, शिस्त आणि परिणाम यावर आधारित शिक्षण प्रणाली उभारणे.

         MMC म्हणजे फक्त क्लास नाही ही शिक्षणाची चळवळ आहे.

 Our Vision (दृष्टी)

  • महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण पोहोचवणे.

  • आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू न देणे.

  • गावागावातून अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक आणि प्रशासकीय अधिकारी घडवणे.

  • “गावातील प्रतिभा – राष्ट्रीय स्तरावर यश” हा नवा शिक्षणाचा मानदंड निर्माण करणे.

आमची दृष्टी स्पष्ट आहे गावातील प्रत्येक मुलामध्ये दडलेला हिरा घडवणे आणि महाराष्ट्राच्या भविष्याला दिशा देणे.

bottom of page